🕒 1 min read
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे व भाजप यांनी हात मिळवत सत्ता स्थापन केली. शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आता पदभार सांभाळला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात काही निर्णय घेतल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्र्यांसोबत थेट दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी या भाजपच्या मोठ्या नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
राज्याच्या विकासात केंद्र शासनाची मोठी भूमिका आहे, तसेच यापुढील काळात राज्याच्या विकासामध्ये केंद्र सरकार नेहमीच पाठिंबा देणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्र सदनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. केंद्रातील या नेत्यांसोबत भेटीनंतर राज्यातील मंत्रिमंडळातील खाते वाटपाबाबत चर्चा झाल्याचेही अंदाज लावला जात आहे. या सगळ्यांमध्ये सध्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चे फोटो राजकीय चर्चेत आहेत.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांनी मला भेटीसाठी भरपूर वेळ दिला असल्याचेही म्हटले आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांसोबत राज्याच्या विकासाची ही चर्चा झाली. राज्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल. शेतकरी कष्टकरी कामगार सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी जे जे काही लागेल जे सहकार्य लागेल, ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिले जाईल, एवढं मोठं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं.
पंतप्रधानांनी त्यांच्या कर्तुत्वाने भारताचा झेंडा संपूर्ण जगात फडकवला आहे. त्यांनी जगात भारताची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना भेटून मलाही आनंद झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एका विचाराचे दोन पक्ष एकत्र आले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा जागर करणारे दोन पक्ष एकत्र आल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde
आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis
यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.@CMOMaharashtra pic.twitter.com/osNhFcgryR— PMO India (@PMOIndia) July 9, 2022
त्याचबरोबर पंतप्रधानांनी बाळासाहेबांबाबतही चर्चा केली. बाळासाहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संबंध हे संपूर्ण जगालाच माहिती होते. मात्र मोदी हे एवढ्या मोठ्या पदावर असतानाही त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढा वेळ दिला ही खूप मोठी गोष्ट आहे. यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी राज्याच्या विकासावर भरभरून चर्चा केली तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राकडून नेहमीच मदत केली जाईल अशी आश्वासनही त्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
