मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि संपूर्ण राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे व भाजप मिळून सत्ता राज्यात स्थापन झाली. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान शिवसेनेत बंड पुकारल्याचे कारण सांगताना बंडखोर आमदारांनी अनेक वेळा उपमुख्यमंत्र्यांकडून होणाऱ्या निधी वाटपाबाबत तक्रारी केल्या आहेत.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीकडे निधीबाबत झुकते माप दिले. तर दुसरीकडे शिवसेनेचा आमदारांना कमी निधी दिलाचे म्हटले जात होते. दरम्यान निधी बाबतच्या या आरोपांवर माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे आमदार म्हणतात आम्ही आमच्या मतदार संघात बारामती सारखं काम करू आणि बारामती ला जास्त निधी दिल्याचेही सांगतात. असा खोचक टोला यावेळी अजित पवार यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.
अजित पवार यांनी यावेळी निधी वाटपाबाबतच्या आरोपांबाबत बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच उल्लेख करून बंडखोर आमदारांना प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून येतात. त्यामुळे त्यांनी तिथे अनेक योजना दिल्या आहेत. त्यामुळे जे महत्वाच्या पदावर असतात ते स्वतःला कधीही झुकतं माप देतात. असही यावेळी अजित पवार म्हणाले. यांची काम केली, जास्त निधी दिला तरी आरडाओरड आणि नाही दिला तरी आरडाओरड करतात. असूद्या हा मनुष्याचा स्वभावच आहे. आता हे याच्या बंडाचे कारण कोणाला द्यावे म्हणून हे काँग्रेस राष्ट्रवादीवर आरोप सुरू आहेत. अशी टीका यावेळी अजित पवार यांनी बंडखोर आमदारांवर केली आहे.
यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाबतही भाष्य केले आहे. ठाण्याच्या सभेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. त्यावेळी शिंदेंनी भाजपकडून होणाऱ्या वागणुकीवर आक्षेप घेतला होता. तसेच मागील सरकारने घेतलेले काही निर्णय या सरकारने त्या निर्णयांना स्थगिती दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सत्तेचे ताम्रपत्र घेऊन कोणीही जन्माला येत नाही सत्ता ही आज असेल तर उद्या दुसऱ्याकडेही जाऊ शकते याचे भान सत्ताधाऱ्यांनी ठेवले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :


