मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या टी-२० मालिका खेळली जात आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ४९ धावा राखून पराभव केला आहे. सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघ १२१ धावांत गारद झाला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडचा डाव
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड संघाकडून जेसन रॉय आणि कर्णधार जोस बटलर सलामीला उतरले होते. मात्र संघाला चांगली सुरुवात करून देण्यात या दोघांनाही अपयश आले. जेसन रॉय (०) तर जोस बटलर (४) धावा करून तंबूत परतले. यानंतर मोईन अली (३५) आणि डेव्हिड विली (३३) याव्यतिरिक्त इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे इंग्लंड संघाला १२१ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह व युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. हर्षल पटेलला एक बळी घेण्यात यश आले.
भारताचा डाव
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने चांगले सुरुवात केली. दोघांनीही पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली. यानंतर रोहित शर्मा ३१ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहली १ धावांवर बाद झाला. ऋषभ पंत (२६ धावा), सूर्यकुमार यादव (१५ धावा), हार्दिक पंड्या (१२ धावा) हे मधल्या फळीतील फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. मात्र शेवटी रवींद्र जडेजा (४६ धावा) उत्कृष्ट कामगिरीच्या वेळेवर भारताला १७० धावा करण्यात यश आले. इंग्लड कडून गोलंदाजी करताना क्रिस जॉर्डनने सर्वाधिक चार गडी बात केले. तर त्याच्या साथीला रिचर्ड ग्लीसनला ३ गडी बाद करण्यात यश आले.
विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप
मागील काही काळापासून विराट कोहली त्याच्या फॉर्मशी झगडताना दिसत आहे. आयपीएल पाठवा आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही खराब कामगिरीचा सामना करत आहे. आयपीएल नंतर विराट पहिल्यांदाच मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळला. मात्र त्याला या सामन्यात १ धावसंख्येवर तंबूत परतावे लागले. विराट कोहली चा खराब फॉर्म भारतासाठी डोकेदुखीत करत आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी विराटची खराब कामगिरी भारतासाठी अडचणी निर्माण करू शकते.
महत्वाच्या बातम्या :


