जालना : आता शासकीय कार्यालयात फोन आल्यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमस्कार ऐवजी वंदे मातरम म्हणावं लागणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतलाय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या निर्णयाचं स्वागत करत या निर्णयाचं समर्थन केलंय. फोनवर नमस्कार ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्यात गैर काय असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केलाय.
शिवाय ज्याला देशाप्रती स्वाभिमान आहे ते वंदे मातरम म्हणतील. मात्र असा कोणताही अध्यादेश सरकारने काढला नाही असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. या निर्णयाला रजा अकादमीने विरोध केलाय. यावर देखील दानवे यांनी भाष्य करत ज्याला विरोध करायचा आहे त्याला फोनवर काय म्हणायचे आहे ते म्हणावे. पण मुनगंटीवार यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. असं सांगत दानवे यांनी या निर्णयाच समर्थन केल. विनायक मेटे यांचं अपघाती निधन ही दुर्दैवी घटना आहे.हा अपघात आहे की घातपात याची पोलीस चौकशी करत असून ही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच हा घातपात आहे की नाही याचा सुगावा लागेल असं दानवे यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Santosh Bangar । “…तर मी कायदा हातात घेणारच”; संतोष बांगर यांचे गंभीर विधान
- Shivendra Raje Bhosale | गणेशोत्सवात डॉल्बी सुरू करा ; शिवेंद्रसिंहराजेंची देवेंद्र फडणवीसांना मागणी
- Vinayak Raut । “उदय सामंत टक्केवारी घेऊन कामं करतात,..”; विनायक राऊतांचे खळबळजनक आरोप
- Sudhir Mungantiwar | श्वास कसा घ्यावा तुम्ही सांगणार का? आव्हाडांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार
- Supreme court | उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच कोर्टात होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

