Share

Vinayak Raut । “उदय सामंत टक्केवारी घेऊन कामं करतात,..”; विनायक राऊतांचे खळबळजनक आरोप

Published On: 

🕒 1 min read

कोकण : शिवसेना आणि शिंदे गटातील नेते हे रोजच एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचे सामने रोजच सांगताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेचे आमदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते कणकवलीत शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यात कुठेही घडत नाही, असे राजकारण रत्नागिरीच्या पाली येथील घरातून घडते, अशी टीका त्यांनी सामंत यांच्यावर केली.

विनायक राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात कुठेही घडत नसेल इतके घाणेरडे राजकारण रत्नागिरीच्या पाली येथून घडते. जे ४० आमदार फुटले त्यापैकी ३९ आमदारांनी कधीच केले नसेल असे राजकरण इथे चालते. तुम्ही पैसे घेऊन या, निवडणुकांना तिकिट दिले जाईल, एवढा घाणेरडा प्रकार इथे चालतो. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीतही आमदार वैभव नाईक यांच्या विरोधी उमेदवाराला ५० लाख रुपये देऊन पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण नाईक हे पूर्ण सिंधुदुर्गाचं वैभव आहेत. दीपक केसरकर, उदय सामंत मंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा.. पण उदय सामंत पालकमंत्री असताना टक्केवारी घेऊन कामं करत होते. अडीच वर्षात त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचं काम केलं.”, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

वॉटर प्युरिफायर घोटाळा-

पुढे बोलताना राऊत म्हणाले कि, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटर प्युरिफायर घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांचे आदेश काढण्यात आले होते. त्यातले 20 टक्के पालकमंत्री सामंत यांचे होते. प्युरिफायर आणि भूमी घोटाळ्यातील जो अधिकारी होता, त्याच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. पण तेव्हाही पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचे नाव यात येऊ नये, म्हणून ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र हे आरोप सामंतांची पाठ सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!