मुंबई : आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत ते एका हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ करत मारताना दिसत आहेत. कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका हॉटेलची पाहणी करत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगर चांगलेच संतापले आणि त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावल्या. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच काहींनी त्यांचे समर्थन केले तर काहींनी बांगर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यातच आता बांगर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
संतोष बांगर म्हणाले कि, “हॉटेलच्या किचनमध्ये खराब झालेली वांगी, कांदे, डाळी आणि भाज्या पाहिल्यावर मला ते सहनच झालं नाही. मला हे सगळं नवीन नाही. गोर गरिबांवर जर अन्याय होत असेल तर मी कायदा हातात घेणारच. मला कशाचीच पर्वा नाही ज्या गोर गरिबांनि मला निवडून दिलं आहे त्यांना न्याय देण्याचं काम मी शिवसेनेच्या माध्यमातून करत राहणार. हे फक्त हिंगोलीतच नाही तर राज्यभर सुरु आहे. मला अनेक ठिकाणांहून फोन आले आहेत कि, तुम्ही अतिशय चांगलं काम केलं. हिंगोलीच्या लोकसंख्येमध्ये आणि माध्यान्ह भोजन योजने अंतर्गत पोचवल्या जाणाऱ्या डब्यांच्या संख्येत मोठी तफावत आहे. त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे. याची चौकशी झाली पाहिजे. या विरोधात मी आवाज उठवणारच.”
“ज्या लोकांनी निडवून दिल आहे त्यांच्यासाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी त्याला घाबरणार नाही. तसेच उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर गुन्हे दाखल व्हावेत”, अशी मागणीही करणार असल्याचं संतोष बांगर म्हणाले.
काय आहे प्रकरण
मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत हिंगोलीतील कामगारांना भोजन पुरवण्याची जबाबदारी ही खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटदारांकडून देण्यात येणारे अन्न हे अगदीच खाण्यायोग्य नाही. त्यातच मार्गदर्शक तत्वांमध्ये शासनाने ठरवून दिलेले अन्न पदार्थ दिले जात नाहीत. यामुळेच संतोष बांगर संतापले होते. त्यांनी आज या उपहारगृहाला भेट दिली व हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी उपहारगृहातीळ सर्व गोष्टींची स्वतः पाहणी केली. त्यात स्वच्छतेची कमतरता होती. एवढेच नाही तर मध्यान्ह भोजनात आळ्या आणि माशा पडलेल्या असल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे बांगर यांनी उपहारगृहाच्या मॅनेजरला जाब विचारत शिवीगाळ केली. तसेच त्याच्या कानशिलातही लगावल्या.
महत्वाच्या बातम्या:
- Sudhir Mungantiwar | श्वास कसा घ्यावा तुम्ही सांगणार का? आव्हाडांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार
- Supreme court | उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच कोर्टात होणार सुनावणी
- Supriya Sule | “घरात बायको पण एवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगतात” ; सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारला टोला
- Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर 46 हजार कोटींचे साम्राज्य कोण सांभाळणार?
- “हात तोडता येत नसेल तर पाय तोडा, जमानत मी घेईल”, शिदें गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान


