🕒 1 min read
मुंबई : सध्या देशामध्ये प्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे वाढत्या प्रदूषणामुळे मानवीजीवन संकटात येऊ लागले आहे . प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रित राहण्यासाठी सरकार कायम कठोर निर्णय घेत असते. यामुळे आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घालण्यासाठी नियम केले आहेत. यामुळे एक जुलैपासून १ जुलैपासून कोणी सिंगल युज प्लास्टिक विकताना किंवा वापरताना आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
या निर्णयावर सर्वात मोठे दुग्ध समूह अमूलने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही दिवसांसाठी पुढे ढकलावी अशी विनंती सरकारला केली आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आणि दुधाच्या वापरावर नाकारात्म परिणाम होईल, असे अमूलने म्हंटले आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
सरकारने जर प्लास्टिकवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली तर देशातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. असे अमूलचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
