Share

“प्रत्येक संकटाला स्मित हास्याने सामोऱ्या जाणाऱ्या…”, नाना पटोलेंच्या राहुल गांधींना शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सशस्त्र दलात भरतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ योजनेचा देशभरात निषेध सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक राज्यांमध्ये तरुणांची निदर्शने पाहता आज (१९ जून) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच त्यांनी देशाच्या सध्याच्या स्थितीवरही चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत.

“आमचा नेता राहुल गांधी. प्रत्येक संकटाला स्मित हास्याने सामोऱ्या जाणाऱ्या आमच्या नेत्याची कीर्ती अशी वाढत राहो, हीच प्रार्थना. राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, असे ट्वीट नाना पटोले यांनी केले आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे की, “मी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि देशभरातील माझ्या हितचिंतकांना आवाहन करतो की, माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही उत्सव साजरा करू नये. देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आम्ही चिंतेत आहोत. करोडो तरुणांची मने दु:खी आहेत. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.” दरम्यान सरकारच्या प्रस्तावित अग्निपथ भरती योजनेच्या निषेधार्थ काँग्रेस नेते रविवारी जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!