Share

Healthy Food Tips | तुमच्या दैनंदिन आहारामध्ये ‘या’ शाकाहारी गोष्टींचा करा समावेश, आरोग्यासाठी आहे ते फायदेशीर

Published On: 

🕒 1 min read

पौष्टिक आहार आणि शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी लोक बहुतेक वेळा मांसाहारी आहाराला प्राधान्य देतात. पण असे नसून अनेक शाकाहारी पदार्थ असे आहेत की ज्यातून आपण आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे देऊ शकतो. आपण आपल्या दैनंदिन आहारात शाकाहारी अन्नाचा समावेश करून आपल्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढू शकतो. शाकाहारी गोष्टींमध्ये अशा अनेक भाज्या आणि फळे आहेत ज्यामुळे तुमच्या आरोग्याला खूप फायदा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल:

फणस

फणस हे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. फणसामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल आणि विटामिन आहेत. ज्यामुळे ते तुमच्या शरीराला निरोगी ठेवते. वजन कमी करण्यासाठी, शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणण्यासाठी, आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी देखील सुद्धा फणस फायदेशीर आहे. फणसामध्ये प्रोटीन, व्हिटॅमि,न फायबर आणि कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे पण फणस तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

बीट

शाकाहारी पोषक आहारामध्ये बीटाचे नाव सगळ्यात वरच्या क्रमांकावर येते. कारण बीटामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, मॅग्नेट, पोटॅशियम आणि विटामिन बी9 उपलब्ध आहे. याशिवाय बीट खाल्ल्याने तुमची रक्ताभिसरण व्यवस्थित होते. आणि शरीरात रक्त देखील चांगले राहते.

टोमॅटो

भाजीत टोमॅटो असेल तर भाजीची चव अधिक चांगली होते. टोमॅटो मध्ये साखरेचे आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते, त्यामुळे टोमॅटो हे तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट लाईकोपीन टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. टोमॅटोमुळे तुमची त्वचा देखील चमकदार बनू शकते.

आवळा

आवळ्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे आवळा औषधी गुणांसाठी एक महत्त्वाचा घटक मानला जातो. फॅट कमी करण्यासाठी लागणारे घटक हे आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर आवळ्यामध्ये अशी काही पोषक तत्वे आहे जी तुमची त्वचा केस आणि डोळे निरोगी ठेवू शकतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!