ठाणे: राज्यात आता विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या दोन दिवसात या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये एकत्रित ठेवले आहे. दोन्ही बाजूकडून निवडणुकीसाठी आपली योजना तयार करत आहेत. तर अपक्ष व इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्या गळाला लावण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरु आहेत. यावरच आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे बोचरी टीका केली आहे.
“राज्यात निर्माण झालेल्या हॉटेल पॉलिटिक्सला जबाबदार कोण आहे? निवडणुकीच्या वेळी आमदारांना विशिष्ट ट्रेनिंगची गरज असते. त्यांना काही सूचना द्यायच्या असतात. पक्षच्या राज्यभरातील सर्व आमदारांना एकत्रं एका ठिकाणी आणलं जात आहे. पूर्वी असं होत नव्हतं. आता होत आहे. महाराष्ट्रात एक राजकीय पक्ष आहे. ज्यांच्याकडे दोन वोट ज्यादा आहेत. जिंकण्यासाठी त्यांना आणखी २० मते हवी आहेत. ते मते कुठून आणणार? चोऱ्यामाऱ्या करूनच मते मिळवणार ना. दहशत आणि दबाव आणूनच मते मिळवली जाणार ना. म्हणून आमच्या या आमदारांना हॉटेलात एकत्र ठेवले आहे. दहशत आणि दबाव हे सर्व प्रकार लोकशाहीत आता खुलेआम सुरू आहे. पूर्वी असे प्रकार लपून छपून करत होते, आता खुलेआम करत आहेत,” अशी टीका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली.
आघाडीत समन्वय नसल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. कोणी कसे मतदान करावं याचे निर्णय झाले आहेत. भाजपने कितीही अफवा पसरवल्या तरी त्याचं त्यांना फळ मिळणार नाही, असं राऊत म्हणाले. आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आहे. अबतक छप्पन. आगे भी जायेंगे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदार, पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेलं भाषण देशाला दिशादर्शक ठरतं, असंही त्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

