Share

“दोन वर्षे जेलमध्ये राहूनही मला डिप्रेशन आले नाही, मग तुम्हाला का येतं” ; भुजबळांचा विद्यार्थ्यांना मिश्किल सवाल

Published On: 

🕒 1 min read

नाशिक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा म्हणजेच एसएससी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र दहावीच्या परीक्षेत यशस्वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना निराश न होता, पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करण्याचा सल्ला महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील नेत्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात बोलताना डिप्रेशन न घेता अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

“मी दोन वर्षे जेलमध्ये राहून आलो तरी मला कधीही डिप्रेशन आले नाही, मग तुम्हाला ऑनलाइन शिक्षणामुळे डिप्रेशन कसे येते?” असा सवालही छगन भुजबळ यांनी परिक्षेत अयशस्वी झालेल्या व अपेक्षित यश न मिळवू शकलेल्या विद्यार्थ्यांना केला आहे.

मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच नाशिक येथे उभारले जाणार आहे. आज त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम दिंडोरी तालुक्यातील शिवनई गावात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नाशिकमधील अनेक विद्यार्थी आणि विद्यापीठाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. यावेळी दहावीच्या निकालाचं औचित्य साधून छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दहावीच्या परीक्षेत यशस्वी झाला नाहीत किंवा तुम्हाला अपेक्षित असे गुण मिळाले नसले तरीही कोणत्याही प्रकारचे डिप्रेशन न बाळगता, विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास करावा, असे छगन भुजबळ म्हणाले. मी दोन वर्षे जेलमध्ये राहून आलो तरी मला कधीही डिप्रेशन आले नाही, मग तुम्हाला ऑनलाइन शिक्षणामुळे डिप्रेशन कसे येते? असा सवालही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उपस्थित करत मिश्कील टीप्पणी केली.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!