🕒 1 min read
Nitesh Rane | सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शक्ती कायदा कधी अस्तित्वात येणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर प्रत्युत्तर देत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शक्ती कायदा अमलात आला असता तर आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये गेले असते. अशी प्रतिक्रिया नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यांनी दिली. आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी शक्ती कायद्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. लव जिहाद तसेच धर्मांतर कायद्यावर सगळेच बोलतायेत. मात्र, शक्ती कायद्यावर कोणीच बोलत नसल्याचा आरोप त्यांनी कोल्हापूरमध्ये केला होता. यावर नितेश राणे म्हणाले, हा कायदा त्यांच्या सरकारवेळीच आणला असता तर त्यांच्या सरकारमधले दोन ते तीन मंत्री जेलमध्ये गेले असते. अगदी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील आत गेले असते.”
रोहित पवारांनी या कायद्याविषयी आधी समजुन घ्यावं. अमेझॉनच्या अलेक्सासारखं त्यांनी बोलू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला. पुढे ते म्हणाले, “आपण पहिल्यांदाच आमदार झाला आहात. पवार साहेबांकडुन काहीतरी शिकावं. पवारसाहेब कसं मोजकच बोलतात आणि करायचं ते करुन टाकतात. हा वेगळ्या प्रकारचा पवार दिसतोय, जो सगळीकडे तोंड घालतो.”
“तुमच्या मतदारसंघाची अवस्था पाहा. 2024 ला निवडून यायचे वांदे आहेत. बायडन, पुतीन हे विषय सोडुन कर्जत जामखेड बघा. शक्ती कायदा सक्षम करुन त्याची अंमलबजावणी सुद्धा आमचं सरकार करेल आणि यानंतर महाविकास आघाडीचे दोन मंत्री आधी आत टाकू आणि ते आमच्या रेंजमध्ये आहेत”, असं नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Prakash Ambedkar | “काँग्रेसने आम्हाला चेपलं, आता उद्धव ठाकरेंनी ठरवावं की…”; शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया
- Breaking News | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्या अचानक दिल्ली दौऱ्यावर, राजकीय घडामोडींना वेग
- Devendra Fadanvis | चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
- Rajesh Tope | पवार साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे, राजेश टोपेंचा राज्य सरकारला इशारा
- Ajit Pawar | शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती सापडली, अजित पवारांनी दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
