🕒 1 min read
मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना आज राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळायला जाणार आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मालिकेत २-१ मे दक्षिण आफ्रिका संघ आघाडीवर आहे. दिल्ली आणि कटक येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. यानंतर विशाखापट्टणम येथील तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले. मालिकेतील खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती. आता चौथ्या सामन्यात भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा उद्देशाने उतरेल. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरताना दिसेल. भारताच्या दृष्टिकोनातून हा सामना ‘करो या मरो’ अशा स्थितीचा आहे. भारतीय संघाला मालिकेत टिकायचे असेल तर हा सामना जिंकावा लागेल.
???? Toss Update ????
South Africa have elected to bowl against #TeamIndia.
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #INDvSA | @Paytm pic.twitter.com/2gR3HYGQiG
— BCCI (@BCCI) June 17, 2022
या मालिकेत नाणेफेकीचा कौलही महत्त्वाचा ठरला आहे. मागील खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आता आजच्या सामन्यात त्याने चौथ्यांदा नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील तीन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकाने नाणेफेक जिंकून दोन सामन्यांमध्ये सहज विजय मिळवला होता. दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन मधील बदल पाहिले तर, भारताने संघात कोणताही बदल केलेला नाही. तर दक्षिण आफ्रिका संघात तीन बदल करण्यात आले आहेत. यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक दुखापतीतून सावरलेल्या पुन्हा संघात परतला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि वेन पार्नेल हे दोघेही आजचा सामना खेळणार नाहीत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी या सामन्यात कमजोर भासत आहे.
???? A look at #TeamIndia's and South Africa's Playing XIs ????
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #INDvSA | @Paytm pic.twitter.com/0tYfy2SWjA
— BCCI (@BCCI) June 17, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ड्वेन प्रिटोरियस, रासी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जेन्सन, लुंगी एनगीडी, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
