Share

Rohit Pawar | “संतांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यास…”; रोहित पवारांचा सुषमा अंधारेना सल्ला

Published On: 

Rohit Pawar | पुणे : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “रेड्याला शिकविण्याचे सामर्थ इथल्या संतांमध्ये आहे म्हणुन चमत्कार …आरे तुम्ही रेंड्यांना शिकवलं रे..! माणसांना कुठं शिकवलं”, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं होतं त्यावर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“संतांच्या किंवा महापुरुषाच्या बाबतीत चुकीचं विधान करू नये. तसं विधान केल्यास माफी मगितली पाहिजे”, असा सल्ला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सुषमा अंधारे यांना दिला आहे. कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीने संतांच्या किंवा महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे विधान करू नये”, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. वारकरी संप्रदायाला जर वाटत असेल, ताई तुमचं चुकत आहे. तर दोन्ही हात जोडून माफी मागताना गैर वाटणार नाही,असं म्हणत त्यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ समाज माध्यमात सर्वत्र व्हायरल होत असताना आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें यांना सुषमा अंधारे यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!