🕒 1 min read
मुंबई : ‘आश्रम ३’ ही वेबसीरीज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता देखील महत्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसत आहे. दरम्यान ईशा गुप्ता मुंबईमध्ये घराबाहेर एकदम हटके लूकमध्ये दिसली. ईशा घराबाहेर पडताच तिला फोटोग्राफर लोकांनी गाठले. यावेळी ईशाला तिच्या लग्नाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला ईशा गुप्ताने दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
ईशा कामानिमित्त घराबाहेर पडते त्यावेळी एक फोटोग्राफर आपला मित्र लग्न करत नसल्याचे ईशाला सांगतो. ईशा यावर हसत हसत उत्तर देते, “तो बिचारा का लग्न करेल? मी देखील लग्न करणार नाही.” ईशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/Ce3abcEqp58/
या व्हिडिओमधून समजते की ईशाला लगेच लग्न करायचे नाही.म्हणजेच एवढ्यात तरी ईशाला संसारात रमायचे नाही हे स्पष्टपणे दिसत आहे. चाहत्यांना ईशाचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
