Share

Sanjay Raut | रोहित पवारांच्या बेळगाव दौऱ्यानंतर राऊतांचा राज्य सरकारला टोला; म्हणाले, ”इच्छा आणि हिम्मत असली की…”

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. शिंदे – फडणवीस सरकारमधील दोन मंत्री कर्नाटकातील बेळगाव येथे जाणार होते, मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलावा लागला.

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे लोकांशी चर्चा करण्यासाठी कर्नाटकातील बेळगावी येथे जात होते. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावला न येण्याची धमकी दिली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काल अचानक बेळगाव दौरा केला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे.

रोहित पवार यांनी गनिमी काव्याने बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन उद्यानातील आपल्या मराठी अस्मितेचे मानबिंदू ,आपले आराध्यदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याचे रोहित पवार म्हणाले.

त्यांच्या या दौऱ्यांनंतर संजय राऊत यांनी ट्विट करत राज्य सरकावर निशाणा साधला. “राज्य सरकारचे मंत्री बेळगावात पोहोचले नाहीत. पण रोहित पवार बेळगावात पोहोचले. इच्छा आणि हिंमत असली की आडवे येणारे पळून जातात”, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!