मुंबई : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीनंतर आयसीसीने नवीनतम कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजी क्रमवारीत जो रूट त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या इतर खेळाडूंनी क्रमवारीत कमालीची प्रगती केली आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १७६ धावा करणाऱ्या जो रूटने ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे. अव्वल १०च्या बाहेरील हालचालींमध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स ५ स्थानांनी २२ व्या स्थानावर आहे. तर चौथ्या डावात शानदार शतक झळकावणारा जॉनी बेअरस्टो १३ स्थानांनी ३९ व्या स्थानावर पोहोचला आहे. ऑली पोप २२ स्थानांनी ५३ व्या स्थानावर आहे आणि अॅलेक्स लीस २६ स्थानांनी ८५ व्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडच्या फॉर्मात असलेल्या डॅरिल मिशेलने ३३ स्थानांची प्रगती करत १७वे स्थान गाठले आहे. तर टॉम ब्लंडेलने ४ स्थानांनी प्रगती करत ३१व्या स्थानावर आला आहे. डेव्हन कॉनवेने १ स्थानाने २३व्या स्थानावर प्रगती केली आहे. दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडलेला केन विल्यमसन पाचव्या स्थानावर आहे. गोलंदाजीत इंग्लंडचा जेम्स अँडरसन सातव्या तर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट चार स्थानांनी प्रगती करत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा मॅथ्यू पॉट्स १८ स्थानांनी ५९व्या स्थानावर पोहोचला आहे. अष्टपैलू रँकिंगमध्ये रवींद्र जडेजा पहिल्या तर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. काइल जेमसन २ स्थानांनी घसरून १०व्या स्थानावर आला आहे. बेन स्टोक्स पाचव्या, कॉलिन डी ग्रँडहोम आठव्या आणि ख्रिस वोक्स नवव्या स्थानावर आहे.
Roooooooooot!@root66 has gone top of the ICC Men's Test batting rankings ???? pic.twitter.com/L150ibQYtz
— England Cricket (@englandcricket) June 15, 2022
Joe Root is the new No.1 Test batter ????
The England stalwart scales the @MRFWorldwide ICC Men’s Test Batting Rankings summit ????
Details ⬇️
— ICC (@ICC) June 15, 2022
मागील तीन वर्षात विराट कोहली ने कोणत्या ही क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये शतक झळकावले नाही. विराट सध्या त्याच्या खराब कामगिरीतून जात आहे. आयपीएल मध्ये खेळताना विराट ला चांगली कामगिरी करता आली नव्हती. तर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खराब कामगिरीचा फटका त्याला जाणवत आहे. नुकत्याच आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय रँकिंगमध्ये विराटची घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. याबाबतीत सध्या भारताच्या खेळाडूंना मागे सोडत पाकिस्तानचे खेळाडू वर्चस्व गाजवताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

