मुंबई: राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे आज (१५ जून) अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज अयोध्येत त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी ही आमची तीर्थयात्रा आहे, राजकीय यात्रा नाही, इथे राजकारण करायला आलेलो नाही, तर रामलल्लाचं दर्शन घ्यायला आलो आहे, असे सांगितले. तसेच, अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी निर्माण करण्यासाठी जागा मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आदित्य ठाकरेंनी सांगितले. यावरूनच आता भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“शिवसेना हिंदुत्वापासून फार दूर गेलेली आहे आणि त्यामुळे हिंदुत्ववादी जनतेला पुन्हा आपलेसे करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारधारा सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधी राहिल्या आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेसाठी जे काही केले ते पटलेले नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा हिंदुत्व अधोरेखित करण्यासाठी अशाप्रकारचा दौरा होत आहे.”, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.
शिवसेना हिंदुत्वापासून फार दूर गेलेली आहे आणि त्यामुळे हिंदुत्ववादी जनतेला पुन्हा आपलेसे करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारधारा सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधी राहिल्या आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेसाठी जे काही केले ते पटलेले नाही (1/2) pic.twitter.com/YQLtJEwtCM
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 15, 2022
दरम्यान “मागील तीन-चार वर्षाच्या काळात अयोध्येत चौथ्यांदा येत आहे. परंतु उत्साह, जल्लोष तोच आहे, तसाच आहे. राम मंदिर निर्माण होत असताना अजून उत्साहाने अनेक शिवसैनिक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश किंवा अन्य राज्यांमधून अयोध्येत आलेले आहेत. रामजन्मभूमीत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. मी सर्व माध्यमांना हीच विनंती करतो की, आमच्यासोबत जो उत्साह, जल्लोष आहे त्याचं देखील थोडं चित्रीकरण करावं आणि देशाला दाखवाव. कारण, हा एक वेगळा विषय आहे.” असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची देखील उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या:
- “अहो दाजी हेच का ते रंजले-गांजले?”, फोटो ट्वीट करत अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
- ICC T20 ranking : ईशान किशनची पहिल्यांदाच ‘टॉप १०’ मध्ये एंट्री; ६९ गुणांची घेतली झेप
- शैलेश लोढांनी मालिका सोडली नाही? अजूनही दिसतात एपिसोडमध्ये…
- “अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार, योगी आदित्यनाथांकडे जागा मागणार” ; आदित्य ठाकरेंची माहिती!
- सामान्यांचे प्रश्न कॅाग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना कळणार नाहीत – संतोष दानवे


