मुंबई: श्री क्षेत्र देहू गाव येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात अनेक राजकीय घटना पहावयास मिळाल्या. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “पंतप्रधान मोदी भागवत धर्माचा प्रसार-प्रचार करत असून ते रंजल्या-गांजल्यासाठी काम करत आहेत.”, असे म्हटले. यावरूनच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
अमोल मिटकरी यांनी अंबानी आणि गौतम अदानी यांचा फोटो पोस्ट करत “अहो दाजी,हेच का ते? रंजले गांजले?”, असा सवाल केला आहे. यातून त्यांनी फडणवीस तसेच भाजपवर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/amolmitkari22/status/1537033331459895297
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात नवा वाद निर्माण झाला आहे. देहू, पुणे येथील मंदिराच्या उद्घाटन समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मंदिराच्या उद्घाटन समारंभात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. मात्र, अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बोलू दिले गेले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
- सामान्यांचे प्रश्न कॅाग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना कळणार नाहीत – संतोष दानवे
- “ठाकरे सरकारकडे फक्त आम्हाला अडचणीत आणण्यासाठी वेळ” ; नवनीत राणा आक्रमक
- राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ ; राजेश टोपेंनी म्हटले…
- ICC ODI rankings: ‘या’ पाकिस्तानी फलंदाजाने विराटला दिला मोठा झटका, वाचा!
- बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, ‘भूल भुलैया 2’ लवकरच होणार OTT वर प्रदर्शित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

