Share

“केंद्रीय यंत्रणा प्रचार यंत्रणा झाल्या” ; राहुल गांधींवरील कारवाईवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Published On: 

अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्येला पोहोचले. जिथे त्यांनी इस्कॉन मंदिरात पूजा केली. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्यावर येथील अनेक संतांनी विरोधही केला होता. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “अयोध्या ही पवित्र भूमी आहे, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. ते म्हणाले की, 2018 मध्ये आम्ही आल्यावर आधी मंदिर मग सरकार, असा नारा दिला होता. त्यानंतर मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत मंदिर बांधले जात आहे.”

यावेळी आदित्य ठाकरे यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कारवाईवर प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणा प्रचार यंत्रणा झाल्या आहेत.

अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार

अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी निर्माण करण्यासाठी जागा मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आदित्य ठाकरेंनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची देखील उपस्थिती होती.

आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील तीन-चार वर्षाच्या काळात अयोध्येत चौथ्यांदा येत आहे. परंतु उत्साह, जल्लोष तोच आहे, तसाच आहे. राम मंदिर निर्माण होत असताना अजून उत्साहाने अनेक शिवसैनिक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश किंवा अन्य राज्यांमधून हे अयोध्येत आलेले आहेत. रामजन्मभूमीत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. मी सर्व माध्यमांना हीच विनंती करतो की, आमच्यासोबत जो उत्साह, जल्लोष आहे त्याचं देखील थोडं चित्रीकरण करावं आणि देशाला दाखवावा. कारण, हा एक वेगळा विषय आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!