Share

“राणा दाम्पत्याला बाहेर काढण्यासाठी मी स्वत: जाईन” – नारायण राणे

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ च्या बाहेर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं होत. आता यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांची माफी मागितल्याशिवाय त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

शिवसेनेच्या या भूमिकेला आव्हान देण्यासाठी आता भाजपकडून नारायण राणे हे मैदानात उतरले आहेत. “राणा कुटुंब घराबाहेर पडण्यासाठी तयार असेल तर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना जाऊ द्यावं. मात्र त्यांना जाऊ दिलं नाही तर काही काळानंतर राणा दाम्पत्याला बाहेर काढण्यासाठी मी स्वत: त्यांच्या घरी जाईन, मग बघू तिकडे कोण येतं”. असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.

राणा पती-पत्नीच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल. राज्यातील सरकारच वातावरण बिघडवत आहे. संजय राऊत आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे, याची माहिती आहे की नाही? सत्ताधारी नेतेच धमक्या देऊ लागल्याने राज्यात पोलीस यंत्रणा आहे की नाही? असे प्रश्न ही नारायण राणेंनी उपस्थितीत केले आहे.

पोलीस राणा यांच्या घरी दाखल –

आता युवा सेनेने राणा दाम्पत्य यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. नवनीत राणा व रवी राणा यांच्याविरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता या तक्रारीवरून राणा दाम्पत्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आता राणा यांच्या घरी दाखल झाले आहेत त्यांना अटक करण्याची प्रक्रिया पार पडत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!