🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात भाजप पक्ष सत्ता आल्यापासून भाजपला अच्छे दिन आले आहेत. सध्या भाजपच्या झोळीत भरभरून देणग्या जात असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी सह इतर दहा पक्षांच्या पदरात मात्र देणग्यांची कमकरता दिसत आहे. याबाबत असोसिएशन डेमोक्रॅटिक रिफॉर्म या निवडणुका सुधारावर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार देशात सत्तेत असणाऱ्या भाजपला लोकांनी भरभरून दान दिले आहे. लोकांनी दान केलेली ही रक्कम २१२ कोटींची आहे. तर देशाच्या राजकारणातील सर्वात जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह इतर दहा पक्षांच्या पदरात फक्त १९ कोटी पडल्याचे चित्र दिसत आहे, तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशातील सात इलेक्टोरल ट्रस्टना कॉर्पोरेट आणि वैयक्तिक देणग्या स्वरूपात २५८.४९ कोटी रुपये मिळाले आहेत. या एकूण निधीपैकी ८२ % निधी एकट्या भाजपच्या खात्यात गेला आहे. जो तब्बल २१२ कोटी इतका आहे.
इलेक्टोरल ट्रस्ट ही ना नफा संस्था असून ती राजकीय पक्षांना कॉर्पोरेट आणि वैयक्तिक देणग्या उपलब्ध करून देते. तर देशातील निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने इलेक्टोरल ट्रस्ट संकल्पना आणण्यात आली होती. ADR ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, एकूण २३ निवडणूक ट्रस्ट पैकी १६ ने २०२०-२१ यावर्षासाठी देणगी अहवाल सादर केला आहे. यापैकी ७ ट्रस्ट ने कोणतीही माहिती दिली नाही.
कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह इतर दहा पक्षांच्या पदरात मात्र देणग्यांची कमकरता दिसत आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आरजेडी सह इतर दहा पक्षांना १९.३८ कोटी रुपये इतकी देणगी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
