Share

IPL 2022 RCB vs SRH : विल्यमसन विरुद्ध विराट..! दोन संघांमध्ये कोण आहे वरचढ? वाचा!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातपासून खेळवला जाईल. आयपीएलच्या १५व्या मोसमात, आरसीबी ७ सामन्यांतून ५ विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद ६ सामन्यांतून ४ विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.

आरसीबी संघाला हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये पोहोचायचे आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघालाही आपली सातत्यपूर्ण विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. हैदराबादने मागील चारही सामने जिंकले आहेत आणि अशा परिस्थितीत आरसीबीचे आव्हान सोपे म्हणता येणार नाही.

सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यांमध्ये आतापर्यंत सनरायझर्सने ११ सामने जिंकले असून आरसीबीने ८ सामने जिंकले आहेत. सध्याच्या खेळाडूंमध्ये हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने बंगळुरूविरुद्धच्या ८ सामन्यात ३५१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने संघासाठी हैदराबादविरुद्धच्या १८ सामन्यात ५६९ धावा केल्या आहेत. त्याने या संघाविरुद्ध सर्वाधिक नाबाद ९३ धावा करत चार अर्धशतके झळकावली आहेत.

अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सनरायझर्स हैदराबादकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सर्वाधिक १६ विकेट घेतल्या आहेत. आरसीबीच्या हर्षल पटेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या ८ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!