Share

“श्रीरामाचं नाव घेण्यास या बबलीचा विरोध होता” – राऊतांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ च्या बाहेर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा केली होती. आता ही भूमिका बदलली आहे. आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट सोडला आहे. त्यानंतर लगेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राणा दाम्पत्यावर हल्ला चढवला आहे.

“पंतप्रधानांच्या दौऱ्याचं कारण सांगून त्यांनी पळ काढला, शेपूट घातलं, अशा शब्दात संजय राऊत यांनी राणांवर टीका केली. तसंच श्रीरामाचं नाव घेण्यासाठी या बबलीचा विरोध होता आणि आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का”? असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थितीत केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “गेल्या दोन दिवसांपासून घंटाधारी बोगस हिंदुत्ववादी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईत येऊन मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा वाचू, अशी भाषा त्यांनी वापरली. अमरावतीच्या बंटी बबलीने गोंधळाचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या दौऱ्याचं कारण सांगून त्यांनी पळ काढला, शेपूट घातलं. पंतप्रधानांच्या दौऱ्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे, ते आमचेही पंतप्रधान आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्याचं रक्षण करण्यासाठी शिवसैनिक ठामपणे उभा राहिल. त्यामुळे बंटी बबलीचा दावा साफ चुकीचा आहे. मला शिवसैनिकांचं आश्चर्य वाटतंय, कौतुकही वाटतंय, की आपात्कालीन परिस्थितीत त्यांच्यासाठी अँम्ब्युलन्स ठेवली होती. मानवतावादी दृष्टीकोन बघा, मला आनंद वाटला”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!