🕒 1 min read
मुंबई : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आमदार बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यावर जावून भेट घेतली. आधी ही भेट केवळ विकास कामांसाठी घेत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले मात्र भेटीनंतर त्यांनी मंत्रिपदाच्या मुद्द्यावरही भाष्य केले.
जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसवलं आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवलं आहे. पण याची काही नाराजी नाही. राजकारणात असं चालू राहतं. आम्ही तितके समजूतदार आहोत. फक्त मंत्रिपदासाठी आम्ही गेलो नव्हतो. फक्त मंत्री आहे म्हणून बच्चू कडू नाही. मंत्रीपदापेक्षा बच्चू कडू जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचं जास्त दु:ख नाही, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. धोका देणाऱ्यांचंच राज्य आहे. जो जास्त धोका देणार, तो मोठा नेता होणार. धोका दिल्यानेच अनेक पक्ष मोठे झाले. भाजपा, शिवसेना असो किंवा इतर कोणी बंडखोरी सगळीकडे झाली आहे. कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत? बंडखोरांचंच राज्य आहे. बंडखोरी करुन येतो त्याला सर्वात आधी मंत्रीपद मिळतं.
महत्वाच्या बातम्या :
- Bachchu Kadu | “जो उशिरा आला त्यांना पहिल्या पंगतीत बसवले आणि…” – मंत्रीमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
- Bihar | काँग्रेस नितीश कुमारांना युपीएचे संयोजक पद देणार?, तर शरद पवारांसाठी हि धोक्याची घंटा असणार?
- Tata Motors | टाटाने Ford चा प्रोडक्शन प्लांट घेतला विकत, फोर्डच्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवणार
- Sharad Pawar । हळूहळू मित्रपक्षांना संपवायचं हीच भाजपाची रणनिती; शरद पवारांची गंभीर टीका
- Sadabhau Khot | कोणताही घटकपक्ष नाराज होणार नाही, कारण… – सदाभाऊ खोत


