🕒 1 min read
मुंबई : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आमदार बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यावर जावून भेट घेतली. आधी ही भेट केवळ विकास कामांसाठी घेत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले मात्र भेटीनंतर त्यांनी मंत्रिपदाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. यावेळी त्यांची नाराजी प्रकर्षाने दिसून आली. जो उशीरा आला त्याला पहिल्या पंगतीमध्ये बसवले गेले. आणि जो पहिला गेले त्याला शेवट बसवले जात आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पण राजकारणात थोडं कमी जास्त होत असते. मात्र आम्ही केवळ मंत्रिपदासाठीच गेलो नव्हतो. मंत्रीपद दिले तरी चांगले, नाही दिले तर त्याहून चांगले. पण मुख्यमंत्री म्हणाले, मी शब्द दिला आहे आणि मी शब्द पाळणाऱ्यातील आहे. त्यावर माझा विश्वास आहे, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले. पुढील मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहितीही बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना दिली. पण याच मंत्रिमंडळाचा विस्तार ४० दिवसांनी झाला आहे, तर पुढचा विस्तार अडीच वर्षात होईल असे वाटते, असा खोचक टोलाही बच्चू कडू त्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Bihar | काँग्रेस नितीश कुमारांना युपीएचे संयोजक पद देणार?, तर शरद पवारांसाठी हि धोक्याची घंटा असणार?
- Tata Motors | टाटाने Ford चा प्रोडक्शन प्लांट घेतला विकत, फोर्डच्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम ठेवणार
- Sharad Pawar । हळूहळू मित्रपक्षांना संपवायचं हीच भाजपाची रणनिती; शरद पवारांची गंभीर टीका
- Sadabhau Khot | कोणताही घटकपक्ष नाराज होणार नाही, कारण… – सदाभाऊ खोत
- Sharad Pawar | “शरद पवार हे पलटीमार राजकारणाचे भीष्म पितामह” ; भाजप आमदाराची खोचक टीका


