टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस नेत्यांनी सत्ताधारी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. तर अजूनही कॉंग्रेसचे काही नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. त्यापैकी इंदापूरचे माजी आ. हर्षवर्धन पाटील हे देखील भाजप पक्षाच्या वाटेवर आहेत. याबाबतच हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा भव्य जन संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधत पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना साथ दिली तरी विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने विश्वासघात करण्याचे सत्र चालूचं ठेवले आहे. त्यामुळे आता याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. इतके दिवस ऐकून घेतल, काही बोललो नाही याचा फायदा घेतला. मात्र आता हे चालणार नाही. आजवर चांगुलपणा बघितला, आता आक्रमकपणा बघा, असे म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आव्हान दिले आहे.
आतापर्यंत ४ वेळा फसवल पण आता फसणार नाही. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गेल्या ५ वर्षात या निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी मतदारसंघासाठी काही केलं नाही. योग्य निर्णय घेऊन मतदारसंघातील नागरिकांचा विचार केला पाहिजे, असे म्हणत पाटील यांनी पक्षांतरा बाबत सूचक विधानं केल आहे. तसेच गेले काही दिवस हर्षवर्धन पाटील भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कॉंग्रेस आघडीवर नाराज हर्षवर्धन पाटील लवकरच भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा करणार आहेत.
- वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी कठोर कायदा हा योग्यचं : नितीन गडकरी
- बैठक शिवसेना भाजपची, चर्चा मात्र मित्रपक्षांचीचं
- मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, उदयनराजेंच्या भेटीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
- भाजपच्या नव्हे तर उदयनराजे आता ‘या’ पक्षाच्या संपर्कात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

