टीम महाराष्ट्र देशा : वाहन चालकास शिस्त लागावी आणि वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी १ सप्टेंबर पासून देशभरात वाहतूकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचं पालन न केल्यास सक्तीने दंड वसुलीही प्रशासनाने सुरु केली आहे. तसेच नियम उल्लंघनाचे दंड देखील १० पटीने वाढवण्यात आले आहेत. मात्र याचा फटका मोटार वाहन चालकांना बसत आहे. कारण इतके दिवस बेशिस्तीने वाहन चालवण्याची सवय असल्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे वाहन चालकांना जड जात आहे. त्यामुळे या कठोर कारवाई बाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या कठोर कारवाईबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला कायद्याचा सन्मान करायला हवा तसेच कायद्याचा धाक लोकांमध्ये असायला हवा. जर वाहतूक नियमांचे उल्लंघन कराल आणि अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल गडकरींनी विचारला आहे. तसेच दंडाची रक्कम वाढविण्याची सरकारची इच्छा नव्हती. मात्र एक वेळ अशी यायला हवी की लोकांना दंड भरण्याची वेळ येऊ नये आणि वाहतूक नियमांचे पालन केले जाईल असं नितीन गडकरींनी सांगितले.
Nitin Gadkari, Minister of Road Transport & Highways, on heavy fines being levied on traffic rules violators: Govt does not desire to raise the limits of the fine. The issue is that a time should come that no one gets penalised and everyone follows the rules. pic.twitter.com/LgZ5mwzFWo
— ANI (@ANI) September 5, 2019
दरम्यान नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात काही ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. तर ग्राहक पंचायतने याबाबत सरकारला काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत. ग्राहकांना कुठलाही कायदा करताना सर्वसामान्य ग्राहकांना विश्वासात घेतलेले नाही. नवीन कायद्यात दहापट दंडाची तरतूद केली आहे. ही शिक्षा लोकशाहीत अव्यावहारिक आहे. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. दहापट दंड श्रीमंत लोक भरू शकतील, पण गरीब आणि सामान्य भरू शकणार नाही. त्यांनी आपली वाहने विकून दंड भरायचा का, असा सवाल ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे.
- बैठक शिवसेना भाजपची, चर्चा मात्र मित्रपक्षांचीचं
- मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, उदयनराजेंच्या भेटीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
- भाजपच्या नव्हे तर उदयनराजे आता ‘या’ पक्षाच्या संपर्कात
- कॉंग्रेसला खिंडार, ‘हा’ मात्तबर नेता शिवसेनेत दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

