टीम महाराष्ट्र देशा : सातारचे खा. उदयनराजे भोसले हे भाजप प्रवेशाच्या तयारीत आहे. तर उदयनराजे भोसले हे दिल्लीत भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले हे नक्कीच भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितल जात आहे. मात्र याबाबत उदयनराजे यांनी अजूनतरी दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे पक्ष प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी शनिवारी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ गुप्त खलबते झाली. त्यामुळे आता उदयनराजे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे उदयन राजे आता नेमका काय निर्णय घेणार यांची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे.
दरम्यान, वरूण सरदेसाई यांनी या भेटीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सध्याच्या राजकारणाचा एकूणच अनिश्चित बाज पाहता उदयनराजे यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
दरम्यान, गेले काही दिवस उदयनराजे भोसले हे भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. तर उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वारंवार भेटीगाठी देखील होत आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठोपाठ उदयनराजे भोसले हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत रणजितसिंह निंबाळकर यांनी ही माहिती दिली आहे. उदयनराजे भोसले लवकरच भाजपात येणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
- होय मी उद्धव ठाकरेंना भेटलोय, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने दिली छातीठोकपणे कबुली
- ‘मला राजकारणातून अलिप्त व्हावंस वाटतंय’
- …तोपर्यंत मोदींना हरवणे शक्य नाही, कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे विधान
- आसाम : एनआरसीच्या अंतिम यादीतून १९ लाख बाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

