Share

बैठक शिवसेना भाजपची, चर्चा मात्र मित्रपक्षांचीचं

Published On: 

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भातली पहिली बैठक मुंबईत काल झाली. यात मित्र पक्षांना कोणत्या जागा देता येतील, यावर प्रामुख्यानं चर्चा झाली. विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी कोणत्या पक्षानं किती जागा लढवायच्या हे अद्याप ठरलेलं नसल्याची माहिती भाजपच्या एका नेत्यानं पीटीआय वृत्त संस्थेला दिली आहे.

रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी संघटना, शिवसंग्राम पक्ष हे भाजपबरोबर असून त्यांना किती जागा सोडायच्या, हे आधी ठरविले जाणार आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. शिवसेनेचा मात्र निम्म्या जागांचा आग्रह आहे. घटकपक्ष भाजपबरोबर असून ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याने त्यांना भाजपने आपल्या कोटय़ातून जागा द्याव्यात, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

दरम्यान, भाजपने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार भाजप महायुतीला 229 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेमुळे भाजपचे मनोबल वाढले आहे. तसेच या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीतही भाजप – शिवसेना युती करूनच निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचं दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला ते यावेळी म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, तरीही महायुतीकरून आम्ही निवडणूक लढवण्यास आमचे प्राधान्य देवू , असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!