Share

माझ पवारांशी बोलण झाल, पुढचा निर्णय हर्षवर्धन पाटलांनी घ्यावा : अशोक चव्हाण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र हर्षवर्धन पाटील ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे संपर्क होऊ शकत नाही. परंतु आता काय करायचं ते हर्षवर्धन पाटील यांनी ठरवायचे आहे. मी सकाळपासून हर्षवर्धन यांना फोन करतोय पण मोबाईल बंद येतोय, असे म्हणत माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी इंदापूरच्या जागेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून कॉंग्रेस आघाडीत कलगीतुरा रंगलेला असतानाचं कॉंग्रेस नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याची तयारी केली आहे. इंदापूरच्या जागेवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी हक्क सांगितला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस ही जागा आपल्याकडेचं ठेवणार असल्याची शक्यता अधिक असल्याने कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भाजपच्या मार्गावर आहेत. मात्र या बाबत माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उलट प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेत पक्ष प्रवेशाबाबत कौल घेतला आहे. तसेच सभेनेही त्यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला आहे. त्यांनीही हा कौल मान्य करून भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. तसेच, येत्या मंगळवारी निर्णय घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या मेळाव्यानंतर काँग्रेस हायकमांड धास्तावले आहे. तर इंदापूरच्या जागेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!