टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे अनेक जुने आणि निष्ठावान नेते पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी भाजप – सेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस पक्षात कमालीची मरगळ आली असल्याची चर्चा आहे. मात्र पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी याबाबत विरुद्ध प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पक्ष सोडून जाऊ लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी या साखर वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाबाबत ते म्हणाले की, या नेत्यांच्या जाण्यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्याचा आनंद साखर वाटून व्यक्त करण्यासाठी अभिनव चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येत्या शुक्रवारी सकाळी साडेदहाला हा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच काही नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. त्यामुळे निवडणुकी आधीच अनेक जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता पर्यंत कॉंग्रेसचे कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, माणिकराव गावीत, निर्मला गावीत इ. नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. तर हर्षवर्धन पाटील हे ही भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत.
- जागावाटपावरून वंचित आघाडीत मिठाचा खडा ? एमआयएम आणि भारिपमध्ये मतभेद
- आजवर चांगुलपणा बघितला, आता आक्रमकपणा बघा, हर्षवर्धन पाटलांचं राष्ट्रवादीला खुल आव्हान
- वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी कठोर कायदा हा योग्यचं : नितीन गडकरी
- बैठक शिवसेना भाजपची, चर्चा मात्र मित्रपक्षांचीचं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
