टीम महाराष्ट्र देशा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य सरकारला धारेवर धरणार आहे. मराठा समाजाला राज्य सरकारने अनेक आश्वासने दिली; मात्र त्यांची पूर्तना न केल्याने आठवड्याभरात सरकारविरोधात रणशिंग फुंकण्याचा इशारा संघटनेच्या समन्वयकांनी दिला आहे. याबाबत ठोक मोर्चा समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, समजाच्या मागण्यांसाठी संघटनेचे समन्वयक मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात; मात्र मंत्री ती टाळतात. अशा मंत्र्यांना ताळ्यावर आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करण्यात येईल. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातील योजना तात्काळ लागू कराव्यात अशा मागण्याही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मराठा क्रांती ठोक मोर्चाने विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर भाजप युतीला पाठींबा देणार असल्याच जाहीर केल आहे. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी मराठा क्रांती ठोक मार्च्याशी बातचीत केली होती. या चर्चेनंतर मराठा क्रांती ठोक मोर्च्याने निवडणुकीतून माघार घेत भाजप युतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मराठा समाजाला राज्य सरकारने अनेक आश्वासने दिली; मात्र त्यांची पूर्तना न केल्याने आठवड्याभरात सरकारविरोधात बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
- कॉंग्रेस नेत्यांच्या जाण्याने कार्यकर्ते खुश, साखर वाटून करणार आनंदोत्सव
- जागावाटपावरून वंचित आघाडीत मिठाचा खडा ? एमआयएम आणि भारिपमध्ये मतभेद
- आजवर चांगुलपणा बघितला, आता आक्रमकपणा बघा, हर्षवर्धन पाटलांचं राष्ट्रवादीला खुल आव्हान
- वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी कठोर कायदा हा योग्यचं : नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

