टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने समविचारी पक्षाला सोबत घेत युती आणि आघाडी करत मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. वंचित आघाडीनेही येत्या विधानसभेसाठी एमआयएम सोबत जागावाटपा संदर्भात चर्चा करायला सुरवात केली आहे. मात्र या चर्चेत प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन आघाडीचे आणि एमआयएमचे दुमत होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जागावाटपावरून वंचित आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी 98 जागांची मागणी केली आहे तर वंचितने एमआयएमला फक्त 8 जागांची ऑफर दिली आहे. हे एमआयएमला मान्य नसल्याने खासदार असदुद्दीनऔवेसी आणि प्रकश आंबेडकर यांच्यात चर्चा होणार आहे. याबाबत औरंगाबादचे एमआयएमचे खा. एम्तियाज जलील यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरु आहे. चर्चेतून जास्तीत जास्त 75 जागांपर्यंत एमआयएम आघाडी मान्य करेल मात्र प्रकाश आंबेडकरांनी खासदार असदुद्दीन औवेसी यांच्याशी चर्चा करण्याचं ठरवलं आहे. राज्यात एमआयएमची ताकद आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक जागांवर आमचे उमेदवार दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे औवेसी आणि प्रकाश आंबेडकर हे चर्चा करून योग्य निर्णय घेणार आहेत.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने भाजप युतीला आणि कॉंग्रेस आघाडीला जोरदार टक्कर दिली होती. विशेष म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात औरंगाबाद मतदारसंघात एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय देखील झाला. तसेच अनेक मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात अपेक्षा लागून राहिल्या आहेत.
- आजवर चांगुलपणा बघितला, आता आक्रमकपणा बघा, हर्षवर्धन पाटलांचं राष्ट्रवादीला खुल आव्हान
- वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी कठोर कायदा हा योग्यचं : नितीन गडकरी
- बैठक शिवसेना भाजपची, चर्चा मात्र मित्रपक्षांचीचं
- मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, उदयनराजेंच्या भेटीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

