Share

आता केवळ एका मिस्ड कॉलद्वारे करता येणार गॅस सिलेंडरचे बुकिंग

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. त्यचबरोबर अनेकदा ग्राहकांना गॅस सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर मिळेपर्यंत लागणाऱ्या वेळेची चिंता असते. मात्र आता केवळ एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे बुकिंग करू शकता. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडनं ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे याचा नागरिकांना फायदा होऊ शकतो.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले आहे की, कोणत्याही व्यक्तीनं 8454955555 या मिस्ड कॉल दिल्यानंतर  कंपनी त्यांना संपर्क करेल, त्यानंतर पत्त्याचा पुरावा आणि आधार कार्डाद्वारे तुम्हाला गॅस कनेक्शन दिलं जाणार आहे. शिवाय याच क्रमांकाद्वारे ग्राहकांना आता आपला गॅस सिलिंडर रिफिलदेखील करता येणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून कंपनीने जारी केलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिला तर तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल.

जर तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीकडे गॅस कनेक्शन असेल तर त्याच पत्त्यावर तुम्ही कनेक्शन घेऊ शकता. परंतु याच्यासाठी तुम्हाला एजन्सीकडे जाऊन  जुनी कागदपत्रे दाखवून तुमचा पत्ता व्हेरिफाय करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच पत्त्यावर गॅस कनेक्शन दिलं जाईल. त्यामुळे आता या सुविधेमुळे लोकांना एलपीजी गॅस बुक करणे सोपे होईल. त्याचप्रमाणे वृद्ध लोकांसाठी देखील ही सुविधा अत्यंत चांगली आहे. यासाठी तुम्हाला एजन्सीच्या येथे धावपळ करण्याची गरज भासणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!