Share

नीरज चोप्राने बायोपिकसाठी दिली ‘या’ दोन अभिनेत्यांना पसंती

Published On: 

मुंबई :  ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक मारली होती. यासह नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची आशा लागली होती. त्याने भारतीयांची आशा पूर्ण केली. आणि शनिवारी नीरज अंतिम फेरी खेळला आणि त्याने भारताला सुवर्ण पदक मिळून दिले. पुरुष भालाफेक स्पर्धेत ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा यापेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम १२ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो.

बुधवारी पार पडलेल्या अ गटाच्या पात्रता फेरीत नीरजने ८६.६५ मीटरपर्यंत भाला फेकत थेट अंतिम फेरीत धडक मारली. नीरजने ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होते. दरम्यान त्याने सर्वोत्तम थ्रो ८७.५८ मीटरचा केला. आणि भारताला तब्बल १३ वर्षानंतर सुर्वण पदक मिळाले. त्यमुळे नीरजवर सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यानंतर सध्या नीरज चोप्राच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता असणार  याबाबत सोशल मिडियावर प्रचंड चर्चा आहे. मात्र स्वतः नीरजने त्याच्या बायोपिकसाठी कोणत्या अभिनेत्याला पाहायला आवडेल हे सांगितले आहे.

यावर नीरज चोप्राने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया देत सांगितले की, ‘माझ्या बायोपिकमध्ये मला हरियाणाचा रणदीप हुड्डाला पाहायला आवडेल. बॉलिवूडमधून अक्षय कुमारही मला खूप आवडतो’, असं नीरज चोप्राने यावेळी सांगितले. नीरज चोप्राच्या यशानंतर अभिनेता रणदीप हुड्डा आणि अक्षय कुमार यांनी एक ट्वीट करत नीरजचे कौतुक केले होते. त्यामुळे आता नीरजच्या बायोपिकसाठी कोणाची निवड निवड केली जाणार यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

https://www.instagram.com/reel/CSRm64uoTiK/?utm_medium=copy_link

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!