मुंबई : प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रानावत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. कंगनाने नुकत्याच दिलेल्या काही मुलाखतींमध्ये आपली बदनामी केली असल्याचा दावा जावेद अख्तर केला होता. जावेद अख्तर यांनी कंगना राणावत विरोधात अंधेरीच्या न्यायालयात हा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.
अभिनेत्री कंगना राणावत हिने तिच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या जामीनपात्र वॉरंटविरोधात सेशन कोर्टात धाव घेतली आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याविरोधात अंधेरीच्या मॅजिस्ट्रेट न्यायालयाने हे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. जावेद अख्तर यांनी तक्रार केल्यानंतर अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर आक्षेप घेत अख्तर यांनी ही याचिका फेटाळण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. कंगनाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करताना दंडाधिकारी न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे जावेद अख्तर यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई करीत कंगनाला फेब्रुवारी २०२१ मध्ये समन्स बजावले. या याचिकेवरील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालय घेण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव शिवाय टीम इंडिया लॉर्ड्सवर रवाना
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने पूरग्रस्तांची थट्टा केली; सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

