Share

दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव शिवाय टीम इंडिया लॉर्ड्सवर रवाना

Published On: 

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जोरदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी लंडनला रवाना झाला आहे. मात्र जखमी खेळाडूंच्या जागी इंग्लंडला गेलेले पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव संघासोबत गेले नाही. कारण अद्यापही त्याचा विलगीकरणाचा कालावधी संपुष्टात आलेला नाही.

इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी पावसामुळे एकाही चेंडुचा खेळ होऊ शकला नाही. परिणामी पहिली कसोटी अनिर्णीत झाली. मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजाच्या चांगल्या कामगिरीमुळे टीम इंडिया विजयाच्या जवळ पोचली होती. मात्र दुर्दैवाने पावसाचे आगमन झाले आणि सामना अनिर्णीत झाला. यादरम्यान ब्रिटनने भारताला कोरोनाच्या रेड लिस्टमधून काढले आहे. त्यामुळे लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

रविवारी ८ ऑगस्ट रोजी ब्रिटनने भारताला रेड लिस्टमधून हटवले आहे. यामुळे भारतीयांना ब्रिटनमध्ये प्रवास करता येणार असल्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली येत्या मंगळवारी इंग्लंडला रवाना होणार आहे. यादरम्यान सुर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांचा विलगीकरण कालावधी १३ ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे १४ ऑगस्टपासुन ते सरावाला सुरुवात करतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!