🕒 1 min read
नवी दिल्ली: वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळतं आहेत. या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून, राजकीय नेत्यांमध्ये वाद व्हायला लागले आहेत. विरोधक प्रकल्प गुजरातला गेलेल्यामुळे सत्ताधारी नेत्यांवर आरोप करत आहेत. तर सत्ताधारी पूर्वीच्या सरकारला दोष देत आहे. अशातच या सगळ्यांमध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडी घेतली आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
हा सामंजस्य करार भारतामध्ये सेमीकंडक्टर्स निर्मितीला वेग देण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ही एक कोटी ५४ लाखांची गुंतवणूक अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला चालना मिळण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे. यामुळे सहाय्यक उद्योगांसाठी एक प्रचंड परिसंस्था तयार होईल. याचा फायदा मध्यम आणि लघू उद्योगांना होईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात मोदींनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे सर्व लिहिलं आहे.
This MoU is an important step accelerating India’s semi-conductor manufacturing ambitions. The investment of Rs 1.54 lakh crore will create a significant impact to boost economy and jobs. This will also create a huge ecosystem for ancillary industries and help our MSMEs. https://t.co/nrRbfKoetd
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2022
तसेच, शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित असल्याचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
पुढे त्यांनी असंही सांगितलं की, या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. तळेगावजवळील 1100 एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. 30 ते लाईफ सायन्स 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :
- Sandeep Deshpande | “बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे”
- Congress | गोव्यामध्ये काँग्रेसचे आठ आमदार फुटले, भाजपमध्ये करणार प्रवेश
- Brahmastra Box Office Collection Day 5 | ‘ब्रह्मास्त्र’ ने 5 दिवसात 150 कोटींचा टप्पा पार केला..
- Vedanta Foxcon | महाराष्ट्राचा वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला का गेला? जाणून घ्या
- Mission Lotus | महाराष्ट्रनंतर गोवामध्ये भाजपचं मिशन लोटस, काँग्रेसला पडणार मोठं खिंडार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
