🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामध्ये आगामी निवडणूकांची सर्व पक्षाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षनेते विरोधी पक्षनेत्यांवर आरोप करताना दिसून येतं आहे. अशातच काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनाला देशभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाबाबत एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी केवळ शरद पवार यांचाच अर्ज आला. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो, हे आपल्याला माहीत आहे. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असावेत, अशी देशातील कार्यकर्ते, नेते, आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. सगळ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी सर्वांची इच्छा मान्य केली, असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
तसेच, मागील दोन वर्षात करोना विषाणूचा संसर्ग असल्यामुळे पक्षाचे अधिवेशन घेता आलं नाही. महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती, लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध होते. आता करोनाचं सावट दूर झालं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खुलं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पक्षाला अशा प्रकारची अधिवेशनं घ्यावीच लागतात.
दरम्यान, या अधिवेशनामध्ये बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप पक्षावर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आम्हाला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे, दिल्ली समोर झुकणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | “महाराष्ट्राची सत्ता ओरबाडून घेतल्यावर तरी भाजपचा आत्मा शांत होईल असे वाटले होते; पण…”; शिवसेनेचा हल्लाबोल
- Navneet Rana | नवनीत राणा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
- Aditya Thackeray । कदम पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे घेणार समाचार; दापोलीत १६ सप्टेंबरला ‘निष्ठा यात्रा’
- Ajit Pawar | आजित पवार पुन्हा नाराज! दोन वेळा सभागृह सोडून गेल्याने चर्चेंना उधाण
- Shivsena Vs Shinde: दादर राड्याप्रकरणी जामीन मिळालेल्या 5 शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक, उद्धव ठाकरे म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
