Share

उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा वाद : नाशिकमध्ये सेनेसह आघाडीत सर्वच पदाधिकारी नाराज

Published On: 

नाशिक – नाशकात उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन खासदार हेमंत गोडसे अडचणीत आले आहेत. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला निमंत्रित न केल्याने शिवसेनेतील अनेक जेष्ठ पदाधिकारी नाराज आहेत. हे नाराज पदाधिकारी थेट उद्धव ठाकरेंकडे याबाबतची तक्रार करणार आहेत. शिवसेनेसोबतच आघाडीचे अनेक नेते देखील गोडसेंवर नाराज झाले आहेत. भुजबळांनी नाराजी व्यक्त  जाहीर केल्याने नाशिकमध्ये आघाडीत दुरावा वाढला आहे.

हेमंत गोडसे यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याला न बोलवता स्वत:च उड्डाणपुलाचं उद्घाटन करुन टाकलं. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी वाट न पाहता उद्घाटन करुन टाकलं. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी बोलताना या उड्डाणपुलाचं अधिकृतरित्या उद्घाटन नितीन गडकरी ऑनलाईन पद्धतीने करणार असल्याचं सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्त्यांवर खड्डे आहेत. लोकांच्या सुविधेसाठी उद्घाटन केलं, असं देखील गोडसे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे या पुलाची उभारणी नुकतीच पूर्ण झाली. फित कापून उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहतुकीसाठी उड्डाणपुल खुला केल्यामुळे शहरवासियांमध्ये तसेच वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असं देखील हेमंत गोडसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!