मुंबई : आगमी टी-२० विश्वचषकाची तयारीसाठी बांग्लादेशच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला अखेरच्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बांग्लादेशने दिलेल्या १२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ अवघ्या ६२ धावांवर अटोपला. यासह बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली आहे.
क्रिकेटविश्वातील दिग्गज संघ म्हणून ओळख असलेला ऑस्ट्रेलियाला बांग्लादेशविरुद्धच्या या मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पाच टी-२० सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला. मालिकेतील पहिले तीन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने चौथा सामना जिंकत पुनरागमन केले. मात्र मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कामगिरी त्याच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट कामगीरी ठरली.
13.4 overs – this is the shortest innings in Australia's cricket history ????
The least number of overs they've batted in an innings since 15 March 1877 ????#BANvAUS pic.twitter.com/oxguuZSvzD
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 9, 2021
अखेरच्या टी-२० सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने कमकुवत बांग्लादेशपुढे अक्षरश: गुडघे टेकले. या सामन्यात १२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या ६२ धावांवर बाद झाला. या सामन्यात केवळ १३.४ षटकात ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ बाद झाला. क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच इतक्या कमी षटकात बाद झाला. ऑस्ट्रेलियाने १५ मार्च १८७७ साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा इतक्या कमी षटकात बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव शिवाय टीम इंडिया लॉर्ड्सवर रवाना
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने पूरग्रस्तांची थट्टा केली; सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना


