Share

MNS : युवराजांना लवकरच शिल्लकसेनेसाठी यात्रा काढावी लागणार; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

Published On: 

Gajanan Kale । मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून आदित्य ठाकरे मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढण्यास सुरवात केली आहे. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात देखील शक्तीप्रदर्शन करत आहेत. आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला 8 जुलैपासून सुरुवात झाली आहे. शिवसेना पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. मात्र यावरून मनसे नेते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरे यांना टोमणा मारला आहे.

गजानन काळे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. ट्विटमध्ये ते म्हणाले कि, आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर काळे यांनी शिवसेनेला शिल्लकसेना असे म्हणत हिणवलं आहे. छोटे नवाब यांनी काढलेल्या निष्ठा यात्रेचे उलट परिणाम दिसू लागलेत. यांचा पक्ष सोडू लागलेत. त्यामुळे त्यांना आता शिल्लकयात्रा काढावी लागणार असं दिसतंय, असं देखील काळे म्हणाले.

दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकत वाढू लागली आहे. आमदारांनंतर सुरवातीला ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. तसेच पुढे कल्याण डोंबिवलीतील ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदेंना समर्थन दिल आहे. तसेच शिवसेनेचे १४ खासदार देखील एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!