Share

Sanjay Raut | शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडली आहे – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात आत्तापर्यंतचे सर्वात मोठे बंड झाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी त्यांची साथ सोडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारले आणि जवळपास 40 हुन जास्त आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आज एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. या घटनेला अनेक दिवस उलटूनही राज्यात अजूनही शिवसेनेत झालेल्या बंडाची चर्चा आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.

“ते बंड आता विसरून जा, कारण शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडली आहे. शिवसेना हा पक्ष ५६ वर्ष काम करत आहे. या काळत आम्ही अनेक वादळं पहिली, अनेक संकट आली, पण शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडली आहे. आता जे काही दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे तो केवळ भास आहे.”, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!