नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा 18 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. विराटबद्दल बरीच अटकळ बांधली जात होती, आता तो टी-20 किंवा वनडे मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोहलीशिवाय नंबर-1 वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल वनडेत बुमराहने 19 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. तसेच, शस्त्रक्रियेनंतर केएल राहुलचेही संघात पुनरागमन झाले आहे.
याशिवाय लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. तर रविचंद्रन अश्विनचेही संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचीही संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, केएल राहुल आणि कुलदीपला फिटनेस चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
निवड समितीने विराट कोहलीला टी-20 मालिकेतून विश्रांती देण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र समितीने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला विचारल्यानंतरच विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या दोन महिन्यांत कोहलीला विश्रांती देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळली नव्हती.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महत्वाच्या बातम्या :
- Breaking News : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती; पुन्हा नव्याने निर्णय घेणार
- Amol mitkari : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडा – अमोल मिटकरी
- Eknath Shinde : “आत्मपरिक्षण करायचं सोडून आम्ही कसे बंडखोर…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Sanjay Shirsat : “शिवसेनेचा उमेदवार हरला तर बाळसाहेब एक ग्लास….”, संजय शिरसाट यांचे वक्तव्य
- Daler Mehndi | मानवी तस्करी प्रकरणात दलेर मेहंदी तुरुंगात; पटियाला न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

