Share

Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत – संजय राऊत

Published On: 

Sanjay Raut । नागपूर : ठाकरे सरकारकडून औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले होते. मात्र आता या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय. तसेच पुढे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले कि, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे सरकारमधील गोंधळाच्या स्थितीसाठी फडणवीसांनाच प्रश्न विचारा, असंही ते म्हणाले. ठाकरे सरकारच्या या निर्णयांना स्थगिती देऊन शिंदे सरकारने नेमकं काय साध्य केलं, असा सवाल विचारल्यावर राऊत म्हणाले, ‘काय साध्य केलंय हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारा. मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. एकिकडे हिंदुत्व सोडलं म्हणून आक्रोश करतायत आणि दुसरीकडे हिंदुत्वासाठी जे निर्णय घेतले, त्यांना स्थगिती कशासाठी देतायत?, असा आक्रमक सवाल देखील राऊत यांनी केलाय.

दरम्यान, संजय राऊत म्हणाले कि, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर का थांबवलं? औरंगजेब हा सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार सरकारवर आहे. त्यामुळे काही काम नसल्याामुळे हे सरकार निर्णयांना स्थगिती देत सुटले आहे, अशी टीका त्यांनी यांनी केली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!