Share

Sushmita Sen and Lalit Modi | सुष्मिता सेन आणि ललित मोदी बांधणार ‘लग्नगाठ’; सोशल मीडियावर तुफान चर्चा

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क: काल सायंकाळी आयपीएलचे माजी चेयरमन ललित मोदी यांनी माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या सोबत मालदीव येथे सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले. त्यानंतर ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांनी लग्न केले असल्याच्या चर्चा पसरू लागल्या आणि पाहता पाहता संपूर्ण सोशल मीडियावर हे दोघे ट्रेंड होऊ लागले. मात्र काही वेळातच मोदी यांनी अजूनही लग्न केले नसल्याचे जाहीर केले.

ललित मोदींनी ट्विट केले की, आम्ही कुटुंबासह मालदीव आणि सार्डिनियाच्या दौऱ्यानंतर लंडनमध्ये परतलो आहोत. यादरम्यान, त्यांनी सुष्मिता सेनचा उल्लेख ‘बेटर हाफ’ असा केला. तसेच नवीन आयुष्याची सुरुवात करत असल्याचेही सांगितले. यासह त्यांनी सुश्मिताबरोबरचे काही फोटोही शेयर केले. हे ट्विट लगेचच व्हायरल झाले आणि या जोडीने लग्न केले असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र काही वेळाने मोदी यांनी दुसरे ट्विट केले की, अजून लग्न केलेले नाही. आम्ही दोघेही सध्या एकमेकांना डेट करत आहेत. मात्र एक दिवस लग्न देखील होईल.

ललित मोदी यांनी इंस्टाग्राम प्रोफाइलचा फोटोही बदलला आहे. नव्या फोटोमध्ये ते सुष्मिता सेनसोबत दिसत आहेत. सुष्मिता सेनने अलीकडेच मालदीवमधील तिच्या सुट्टीचे फोटो शेअर केले होते. ती आपल्या मुलींसह येथे गेली होती. तर मोदींनी शेयर केलेल्या या फोटोंमुळे आता हे स्पष्ट होत आहे कि या ट्रीपमध्ये मोदी सुद्धा सुश्मिता आणि तिच्या फॅमिलीसोबत होते. सुष्मिता सेन हि 46 वर्षांची असून या आधी ती तिच्याहून १६ वर्षांनी लहान असलेल्या रोहमन शॉल याच्यासोबत ३ वर्षे रिलेशनशिप मध्ये होती. काही महिन्यांपूर्वीच तिचे ब्रेकअप झाले असून आता ती 56 वर्षीय ललित मोदी यांना डेट करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!