मुंबई : भारताचे (Team India) माजी सलामीवीर फलंदाज अरुण लाल (Arun Lal) वयाच्या ६६ व्या वर्षी पुन्हा लग्न करणार आहेत. त्यांच्या भावी पत्नीचे नाव बुलबुल साहा (BulBul Saha) असून ती व्यवसायाने शिक्षिका आहे. तिचे वय ३८ वर्षे आहे आणि ती अरुण यांच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान आहे. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. अरुण यांच्या लग्नाशी संबंधित एक कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यानुसार ते २ मे रोजी कोलकाता येथील हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. अरुण लाल सध्या बंगालच्या रणजी संघाचे प्रशिक्षक आहेत.
अरुण यांनी रीना यांच्याशी पहिले लग्न केले होते आणि दोघांनीही संमतीने घटस्फोट घेतला होता. अरुण लाल यांनी नव्या लग्नासाठी आपल्या पहिल्या पत्नीची परवानगी देखील घेतली आहे आणि त्यांच्या संमतीनंतरच बुलबुलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, अरुण लाल यांनी महिनाभरापूर्वी साखरपुडा केला होता.
ऐकलं का..! वयाच्या ६६व्या वर्षी भारताचा 'दिग्गज' क्रिकेटपटू करतोय लग्न; होणारी बायको आहे ३८ वर्षांची!#TeamIndia #maharashtradeshahttps://t.co/LZnmOWcNuv
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) April 25, 2022
Arun Lal, 66, will get married for the second time as he is set to tie the knot with 38-year-old Bul Bul Saha on May 2.https://t.co/3Qquj8kTnx
— Circle of Cricket (@circleofcricket) April 24, 2022
अरुण लाल यांचा त्यांची पहिली पत्नी रीनापासून घटस्फोट झाला असला, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काही काळ तिच्यासोबत राहत होते. लग्नानंतर अरुण लाल आणि बुलबुल आजारी असलेल्या रीना यांचीही काळजी घेतील. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या पदाधिकाऱ्यांशिवाय बंगाल संघाचे खेळाडूही त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
अरुण लाल यांची कारकीर्द
अरुण लाल यांनी भारतासाठी १६ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्यांनी अनुक्रमे ७२९ आणि १२२ धावा केल्या. अरुण यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आले नाही. त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये १५६ सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी ३० शतके झळकावत एकूण १०४२१ धावा केल्या. त्यांचे वडील, काका आणि चुलत भाऊ सुद्धा रणजी ट्रॉफी खेळले होते. अरुण यांना ६ वर्षांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यामुळेच त्यांनी कॉमेंट्री सोडली. यातून सावरल्यानंतर ते प्रशिक्षक म्हणून पुन्हा मैदानात परतले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

