Share

“IPL स्पर्धेत ‘हा’ नियम लागू केला पाहिजे”, यंदा लागोपाठ शतके ठोकणाऱ्या जोस बटलरची इच्छा!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सचा (RR) फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) तुफान फॉर्मात आहे. बटलर क्रिकेटविषयी अनेकदा मते देत असतो. यावेळी त्याने आयपीएलमध्ये एक नियम लागू करण्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. हा नियम स्लो ओव्हर रेटबाबत आहे.

जोस बटलरच्या मते, जर ओव्हर रेटच्या बाबतीत संघ संथ राहिला तर ३० यार्डच्या वर्तुळात अतिरिक्त क्षेत्ररक्षक आणला पाहिजे. जेणेकरून फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मिळू शकेल.” ईएसपीएन क्रिकइन्फोवरील संभाषणादरम्यान जोस बटलरला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. ”जर तू संघाचा कर्णधार असता, तर तू अश्विनला मंकडिंगला करू दिली असती का”, असा प्रश्न बटलरला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्याने अजिबात नाही असे सांगितले.

सध्या आयपीएल २०२२मध्ये बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ६५ चेंडूत ९ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ११६ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याचे हे सलग दुसरे आणि या मोसमातील तिसरे शतक आहे. ऑरेंज कॅपच्या यादीत तो अव्वल आहे आणि त्याच्या आसपास एकही फलंदाज नाही.

आयपीएल २०२२च्या ३४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा १५ धावांनी पराभव केला आणि पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान गाठले होते. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत २२२/२ धावा केल्या, प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ २०७/८ धावाच करू शकला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!