Share

…तर बाळासाहेब ठाकरेंवरही गुन्हा दाखल केला असता का? ; भाजपचा शिवसेनेला सवाल

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. या पाश्वर्भूमीवर युवा सेनेने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात काल तक्रार नोंदविली होती. यानंतर पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले होते. यावेळी राणा यांनी वारंटची मागणी करत, हाय वोल्टेज ड्रामा केला. दरम्यान पोलीस आणि राणा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली.

यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. फडणविसांनी हनुमान चालीसावर आक्रमक वक्तव्य केली आहेत. हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का? असा प्रश्नही पत्रकार परिषदेत यावेळी त्यांनी उपस्थितीत केला आहे.

या पाश्वर्भूमीवर भाजपने शिवसेनेला “बाळासाहेब ठाकरेंवरही गुन्हा दाखल केला असता का”?  असा थेट सवाल केला आहे.

भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय

“हनुमान चालीसा म्हणंण राजद्रोह असेल तर आम्ही रोज म्हणू, हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का? भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय. राज्यात सरकार हिटलरप्रमाणे वागतंय. झुंडशाहीला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. यासह मुंबईतील हल्ले मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशाने होत आहेत. तर राज्य भरातील हल्ले गृहमंत्र्यांच्या आदेशाने होत आहेत,” असा थेट आरोप फडणविसांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!